maharashtra day, workers day, shivshahi news,

स्व.प्रमिला बाई देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाला १०००१ रू भेट

संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली २४ वर्षा पासून भजनी मंडळाचे अखंड कार्य

10001 rupees gift to Sadguru Eknath Maharaj Bhajani Mandal, khamgaon, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सोयगाव (प्रतिनिधी रईस शेख)

खामगाव शहरातील सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २४ वर्षा पासून मंडळाच्या माध्यमातून अनेक धार्मिक व सामाजिक जनसेवा रूग्ण सेवा असे अनेक  उपक्रम अखंडपणे निस्वार्थ पारदर्शक भावनेतून " मुख मे हो राम नाम , राम सेवा हाथ मे "हे ध्येय घेऊन कार्य करत आहे मुन्नाभाऊ यांचे पारदर्शक सेवा कार्य पाहून त्यांच्या या कार्याला खारीचा वाटा म्हणून भजनी मंडळाच्या संस्थापक एकनिष्ठ सदस्या मंडळ स्थापने आदी पासून मुन्ना भाऊ शर्मा यांच्या सोबत राहुन प्रत्येक कार्यात तन, मन, धनाने पुढे राहुन सहभागी राहणाऱ्या स्व.प्रमिला बाई आनंदराव देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री प्रल्हाद भाऊ देशमुख, श्री विनोद भाऊ देशमुख व देशमुख परिवाराच्या वतीने आज दिं ५-८-२०२४ रविवार रोजी भजनी मंडळा भजनाचे साहित्य घेण्या करिता व सामाजिक कार्या करिता रू दहा हजार एक रूपये देणगी देण्यात आली. 

या प्रसंगी भजनी मंडळाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, विनोद सुकाळे,अरूण कडवकर, दिलिप झापर्डे, प्रल्हाद भाऊ देशमुख,विनोदभाऊ देशमुख, लालाजी सांगळे,बंटी देशमुख,विक्की देशमुख,दिपु देशमुख,आशाबाई अंधारे,पार्वतीबाई सुकाळे, मंगला बावस्कर, संगिता देशमुख,शालीनी ताई देशमुख, वर्षाताई देशमुख,गायत्री देशमुख,व देशमुख परिवार भजनी मंडळाचे सदस्य हजर होते अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !