विधीसेवा समिती वाई, वकिलसंघ वाई आणि चिंधवली ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे)
माननीय उच्च न्यायालयात विधीसेवा समिती , मुंबई व माननीय जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सातारा यांच्या आदेशान्वय न्यायालयातील प्रलंबित असणारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणाकरिता तालुका विधीसेवा समिती वाई व वकिलसंघ वाई व चिंधवली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल लोक आदालत (फिरते अदालत) सेवानिवृत्त न्यायधिश बी. डी. खटावकर विदिज्ञ ॲड. अक्षय भाडळकर वरिष्ठ लिपिक डि.बी किर्वे, एस. व्ही. जगताप, लघुलेखक एस. डी. वर्णेकर, कनिष्ठ लिपिक पु. डी जायगुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी चिंधवली तालुका वाई येथिल हॉल मध्ये घेण्यात आले, यावेळी सरपच शोभा चव्हाण, उपसरपंच विजय ईथापे जेष्ठ नागरिक नामदेव इथापे (गुरुजी) सर्व सदस्य ग्रामसेवक किरण निकम व पी. एस. भिसे (शिपाई ) चिंधवली भुईंज पाचवड या गावातील सर्व शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा