maharashtra day, workers day, shivshahi news,

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांचे निधन

२७ ऑगस्ट रोजी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

mp vasantrao chavan, naigaon, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर) 

मितभाषी व मनमिळाऊ स्वभावामुळे ते जेवढे जनतेत लोकप्रिय होते तेवढेच चव्हाण कुंटंबातही होते. मात्र हैद्राबाद येथील किम्स हॉस्पीटलमध्ये त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि सोमवारी पहाटे ४.५ मिनिटाला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर दि. २७ रोजी सकाळी नायगाव येथील हनुमान मंदिराच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयातउपचार घेत असलेल्या खा. वसंतराव पा.चव्हाण यांची सोमवारी पहाटे प्राणज्योत मालवली. त्याची अचानक तब्येत बिघडल्याने १३ आँगस्ट रोजी हैद्राबाद येथील किम्स हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर  २७ रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजता नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यात आल्याने त्यांची धावपळ झाली होती. त्यामुळे दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी तब्येत बिघडल्याने अगोदर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात व सायंकाळी हैद्राबाद येथील किम्स रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना दि.२६ आँगस्ट रोजी पहाटे ४.५ मिनिटाला त्यांची प्राणज्योत मालवली.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसचे काय होणार अशी चर्चा होत असताना लोकसभा निवडणूक मी सर्व ताकदीने लढणार असल्याचे जाहीर करुन प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला व खा. अशोकराव चव्हाण यांना दणका बसला. खासदार म्हणून निवडून आले.

कै. खासदार वसंतराव चव्हाण यांची कारकीर्द

जन्म :15 ऑगस्ट 1954

जन्मगांव : नायगाव (बा.) 

1978  - नायगाव ग्रामपंचायत चे सरपंच म्हणून निवड सलग 24 वर्ष सरपंच पदावर कार्य.

1990- नांदेड जिल्हा परिषद चे   नायगाव गटातून जिल्हापरिषद सदस्य. 

2002- नांदेड जिल्हा परिषद चे नायगाव गटातून दुसऱ्यांदा  जिल्हा परिषद सदस्य.

2002-2008 : राज्यपाल नामनिर्देशीत विधानपरिषद सदस्य 

2008:  एज्यूकेशन सोसायटी नायगाव चे अध्यक्ष 

2009: नायगाव- उमरी- धर्माबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रथम  अपक्ष आमदार म्हणून निवड.

2014 : नायगाव -उमरी - धर्माबाद विधानसभा मतदार संघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विधानसभा सदस्य म्हणून निवड. 

9 मे 2016-25 मे 2022 : कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव चे सभापती.

16 एप्रिल 2021: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे अध्यक्ष.

 2024: नांदेड लोकसभा मतदार संघातून खासदार  म्हणून निवड.


---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !