माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टे व समाजसेवक अशोक शिंदे यांचे शिक्षक व विद्यार्थ्यां कडून कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर ( शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे व समाजसेवक अशोक (पिंटू) शिंदे यांचा उपस्थितीमध्ये आज माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगोला रोड वरील असलेले अविनाश शाळा क्रमांक 10 या शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके तसेच शालेय साहित्य यांचे वाटप केले. आणि खाऊ वाटपाचे कार्यक्रम पार पडला. अविनाश शाळा क्रमांक 10 या नगरपालिकेच्या शाळेच्या भोवती सुशोभीकरण व्हावे. अशी मागणी या अविनाश शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्गाने केली असता आज आता ताबडतोब याप्रमाणे माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंद पट्टे व समाजसेवक अशोक(पिंटू) शिंदे यांनी सुशोभीकरण करण्याचे काम त्वरित केले .आणि प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे व समाजसेवक अशोक (पिंटू) शिंदे यांनी तेथील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना कधीही केव्हाही गरज भासल्यास आम्हाला बोलवा आम्ही तुमच्या अडीअडचणी सोडवू. असे आश्वासन दिले.
अविनाश शाळा क्रमांक 10 येथील शिक्षक व विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करीत असताना ते शिक्षक पुढे म्हणाले जणू विठ्ठल धावत आला असे कौतुक माजी नगराध्यक्ष वामन तात्या बनपट्टे व समाजसेवक अशोक (पिंटू) शिंदे यांचे करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित समाजसेवक अशोक (पिंटू) शिंदे यांच्या स्वखर्चातून अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये व प्राथमिक विद्यालयामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय साहित्य वाटप व खाऊचे वाटप करून एक वेगळ्या अनोख्या पद्धतीने प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी समाधान माळी ज्ञानेश्वर बनसोडे संतोष राऊत विठ्ठल डोके नागेश राहिरकर प्रशांत डोके भगवान देवकर वैभव माने प्रशांत राहिरकर
पिंटु देवमारे गणेश लोखंडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा