मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणीं)
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त मंदिर समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 8.15 वाजता राष्ट्रीय ध्वजारोहणाचा समारंभ श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे व ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, मंदीर समितीचे सर्व विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख विनोद पाटील, राजेंद्र सुभेदार, चंद्रकांत कोळी, बलभीम पावले, सहाय्यक विभाग प्रमुख सावता हजारे, दादा नलवडे, भाऊसाहेब घोरपडे यांनी परिश्रम घेतले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा