maharashtra day, workers day, shivshahi news,

मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट - सलग सुट्ट्यामुळे भाविकांची दर्शन रांगेत गर्दी

मंदिर प्रशासनामार्फत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध

Flower decoration, vitthal mandir, pandharpur, so;apur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणीं) 

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास व भक्तनिवास इमारतीस तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. तसेच मंदिरात देखील आकर्षक फुलांनी सजवले आहे. मंदिरातील प्रवेशद्वार, चारखांबी, सोळखांबी, मंदिरा बाहेर अशा ठिकाणी तीन रंगांच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. सदरची फुलांची आरास श्रीमंत दगडूशेठ मोरया प्रतिष्ठान पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे. त्यासाठी त्यांनी केशरी झेंडू, स्पिंगर, शेवंती इत्यादी एक टन फुलाचा वापर करून आरास केली आहे. त्याचबरोबर श्री. संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रांमध्ये विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा सुमारे दोन हजार भाविकांनी लाभ घेतला. त्यासाठी श्री विठ्ठल गण सभा ट्रस्ट, तिरुअनंतपुरम यांनी सुमारे एक लाख 25 हजार किमतीचे अन्नधान्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. तसेच परंपरेनुसार दुपारी पोशाखा वेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आले.

दि.15 ऑगस्ट 2024  रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन व 16 ऑगसट रोजीची पुत्रदा एकादशी व त्यानंतर सलग शासकीय सुट्ट्या आल्याने व श्रावण मास असल्याने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविकांची होणारी  संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकांची नेमणूक, व्हीआयपी दर्शन व्यवस्था निर्बंध, भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजाची संख्याही कमी करण्यात आली आहे. तसेच चांगली स्वच्छता व्यवस्था, मजबूत बॅरेकेटिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साबुदाणा - तांदळाची खिचडी, चहा वाटप इत्यादी व्यवस्था दर्शन रांगेत करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

 

sudhakar pant paricharak, mla samadhan autade, shivshahi news,

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !