विद्यार्थ्यांची गावामध्ये प्रभात फेरी
शिवशाही वृतसेवा, सोयगाव तालुका प्रतिनिधी, रईस शेख
दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन राम रक्षा इंग्लिश स्कूल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व तसेच रामरक्षा इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांची गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली स्वातंत्र्य दिनाच्या जय घोषणा देण्यात आले तसेच शाळेतील तिरंगा ध्वज आदर्श शेतकरी भगवान जुंबळ यांच्या हस्ते फडकविण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सेन्ट्रल बँक सातव सर व खरात सर उपस्थित होते व तसेच शाळेचे संचालक सुरेश पवार सर व मुख्याध्यापक निलेश पवार सर उपस्थित होते .
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन वेगवेगळे नृत्य, नाटक, देशभक्तीपर गीत आयोजित केली तसेच शाळेतील सर्व वर्ग शिक्षक व गावातील नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा