खा.वसंत चव्हाण यांच्या प्रकृतीच्या सुधारणेची ईश्वर चरणी प्रार्थना केली.
शिवशाही वृतसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी कुंटूरकर
नांदेड चे लोकप्रिय खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी या अपेक्षेने सामाजिक कार्यकर्ते मारोती कतूरवार यांच्या पुढाकारातून स्वामी रामानंद चौक येथील कतूर्वार यांच्या निवास स्थाना समोर गुरुवार निम्मित साईबाबाची महाआरती व हनुमान चालीसा पठन,कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी आनेकांनी मनोगत मांडत खा.वसंत चव्हाण यांच्या प्रकृतीच्या सुधारणेची ईश्वर चरणी प्रार्थना केली. या वेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे,नगरसेवक ललिता भालेराव मॅडम,प्र रविद्र भालेराव, सुमित हणमंतराव पा. चव्हाण , श्रीनिवास जवादवार,ओमप्रकाश नारलावार , मनोज आरगुल वार,पवन गादेवार,कदम साहेब तलाठी,कटके,देमेवार टेलर,ज्यू जानी परमेश्वर भालेराव, परत वाड जमादार,आदींची उपस्थितीहोती. हॉस्टेल च्या विद्यार्थीनी,परिसरातील नागरिक ,मोठ्या संख्येने महिलांची लक्षणीय उपस्थितीती होती.
--------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा