पिस्तूल आणी बंदुक केली जप्त आरोपीला केले गजाआड .बावधन मध्ये खळबळ
शिवशाही वृतसेवा,सातारा जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे
वाई तालुक्यातील राजकीय दृष्ट्या ओळख असलेल्या बावधन गावचे रहिवासी असलेले अविनाश पिसाळ यांच्या घरावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गुन्हेगारांचे गर्दनकाळ असा नावलौकिक प्राप्त असलेले पोलिस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण सहाय्यक फौजदार मदन वरखडे श्रीनिवास बिराजदार श्रावण राठोड रुपेश जाधव महिला पोलिस सुतार या पोलिस पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर सायंकाळी सापळा लावुन धाडसी छापा टाकुन एक बंदुक आणी एक पिस्तुल जप्त करुन यातील आरोपी असलेला अविनाश पिसाळ यास गजाआड केल्याची माहिती क्षणातच बावधन गावासह संपुर्ण वाई तालुक्यात पसरल्याने खळबळ उडाली आहे .तर केलेल्या या धाडसी कारवाईतील पोलिस अधीकारी व पोलिस पथकाचे वाई तालुक्यातील नागरीकांनी अभिनंदन केले आहे .
मिळालेली माहिती अशी की वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांना रविवार दि.१८ रोजी दुपारी त्यांच्या खास खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की बावधन वाई येथील रहिवासी असलेला अविनाश पिसाळ याच्या राहत्या घरात त्याने एक बंदुक लपवुन ठेवली आहे तर घरा समोर स्वताची उभी असलेल्या चारचाकी वाहनात एक पिस्तुल लपवुन ठेवला आहे .
हि घटना गंभीर असल्याने त्यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण सहाय्यक फौजदार मदन वरखडे श्रीनिवास बिराजदार श्रावण राठोड रुपेश जाधव महिला पोलिस सुतार यांना बोलावून घेवुन
त्यांचे पोलिस पथक तयार करुन या गंभीर घटनेची माहिती दिली .व तातडीने बावधन येथील अविनाश पिसाळ याच्या घरा भोवती सापळा रचून आरोपीसह बंदुक आणी पिस्तुल ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.
या पथकाने दुपार पासुनच अविनाश पिसाळ याच्या राहत्या घराभोवती सापळा लावला होता आणी अविनाश पिसाळ याच्या हालचाली वर बारकाईने करडी नजर ठेवली होती .अखेर लावलेल्या सापळ्यात आरोपी आपोआप अडकला .पथकाने त्यास ताब्यात घेवुन त्याच्या कडून एक बंदुक आणी एक पिस्तुल पिस्तुल जप्त केला आहे .पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा