मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साताऱ्यात रविवारी आयोजन होते
शिवशाही वृतसेवा, शूभम कोदे, सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रम रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12.15 वाजता सैनिक स्कूल मैदान, सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास विभाग मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार होते . या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले होते .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा