उमरी येथील आदर्श सरपंच सन्मान सोहळा संपन्न
शिवशाही वृतसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी कुंटूरकर
उमरी तालुक्यातील 58 ग्रामपंचायत पैकी पंधरा गावातील उत्कृष्टरित्या कामगिरी केलेल्या सरपंचाची पुरोगामी सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य वतीने निवड करून त्यांना आदर्श सरपंच म्हणून ज्येष्ठ नेते गोविंदराव पाटील सिंधीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रामचंद्र येईलवाड, प्रल्हाद पाटील इज्जतगावकर व स्वागताध्यक्ष डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शासनाच्या निधीचा खर्च करण्याचा अधिकार सरपंच यांना देण्यात यावा, दरमहा सरपंचांना मानधन देण्यात यावे, राज्य पातळीवरील व केंद्र पातळीवरील अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात यावे अशा विविध मागण्याच्या संदर्भात कार्यरत असलेली पुरोगामी सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य रजी.या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी येथील कै. गिरीश भाऊ गोरठकर सांस्कृतिक सभागृह येथे नुकताच आदर्श सरपंच सन्मान सोहळा संपन्न झाला, यामध्ये प्रकाश पाटील चिंचाळकर, दत्ता पाटील पांढरे, संदीप पाटील कवळे, किशनराव कुदळेकर, अँड शिवराज कोळीकर, महेंद्र मुन्नी विध्वंस यांच्या उपस्थिती होती सदर कार्यक्रमात माधवराव पाटील हिवराळे शिंगणापूर, रामजी तोगरवाड भाहेगाव,सौ. संतोषी देशमुख तळेगाव, शहाजी पाटील गाढे बळेगाव, राजीव कसबे कळगाव, विजयामाला पवार हंगरगा,सौ मंजुषा पंतोजी सोमठाणा, सौ .मीराबाई गायकवाड नागठाणा, मीनाबाई ढेरे नागठाणा, सौ .ज्योती गोरठकर रामखडक, सौ .सुकेशनी मालू भेरजे मनुर, स्वरूपा माधवराव भुजबळे हिरडगाव, बालाजी वाघमारे अब्दुलापूर वाडी या सरपंच महोदय यांना सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल पुष्पहार देऊन आदर्श सरपंच म्हणून सन्मानित करण्यात आले, यावेळी लक्ष्मण पाटील बेलकर, ग्राम विस्तार अधिकारी व्यंकटेश बैलकवाड, संजय पाटील शिंदे, डिके पवार, शाहीर चंद्रकांत गायकवाड,शाहीर साहेबराव सूर्यकार,पत्रकार शिवाजी कुंटूरकर, माधव ऐंजपवाड, एम के चंदन यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आयोजक माधव बैलकवाड यांनी तर आभार दिगंबर गायकवाड यांनी मांडले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा