छत्रपती आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन
शिवशाही वृतसेवा, सातारा जिल्हा प्रतिनिधी , शुभम कोदे
मागिल वर्षी जसा मोठय प्रमाणात आपला ऊस प्रतापगड सहकारी साखर कारखानान्यास घातला त्या पेक्षा ही जास्त ऊस आपण या वर्षी घाला असे आवाहन छत्रपती आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले ते भुईंज विकास सेवा सोसायटी येथे ऊस उत्पादक शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते . मागली वर्षी आपण सर्वांनी प्रतापगड कारखाण्यास ऊस दिला त्या बदल त्यानी सर्वांचे आभार मानले तसेच त्यानी शेतकऱ्याच्या ऊस तोडणी साठी असणाऱ्या आडी अडचणी समजावून घेत त्या वरती योग्य ती उपाय योजना करण्यात येईल असे सांगितले.प्रतापगड ही सुद्धा तुमची संस्था असून ती आपण सर्वांनी मिळून तोट्यातुन बाहेर काढू त्या साठी जास्तीत जास्त ऊस या संस्थेला घाला असे ही ते म्हणाले .
यावेळी.अजिंक्यतारा कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव सावंत, माजी चेअरमन सर्जेराव सावंत, रामभाऊ जगदाळे, राजू शेडगे , संचालक नितीन शिंगटे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे शेती अधिकारी विलास पाटील, प्रतापगड साखर कारखान्याचे शेती अधिकारी लालसिंग शिंदे, धनंजय शिंगटे मोहन भोसले, गजानन भोसले भुईंज विकास सेवा सोसायटीचे चेरमन मदन शिंदे व्हाईस चेअरमन नारायण धुरगुडे,प्रभाकर भोसले, लक्ष्मण वारागडे, सरपंच विजय वेळे,महेंद्र जाधव,शेखर भोसले,प्रगतशील शेतकरी प्रफुल शिंदे,राहुल शिंदे, रवींद्र जाधव, विशाल निकम, तसेच किकली देगांव जांब चिधवली, निकमवाडी, उडतरे, पाचवड, कळबे, व भुईंज पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी देखील मोठया संख्येने उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा