सरपंच ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष ?
शिवशाही वृतसेवा बुलढाणा, जिल्हा प्र प्रतिक सोनपसारे
सिंदखेड राजा पासून 12 किमी अंतरावर असलेले ऐतिहासिक ग्राम आडगाव राजा येथील जिल्हा परिषेद शाळेच्या मैदानात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे शेतकऱ्यांना पाहिजे तसा पाऊस पडला नाही आज पहाटे पासून नेमकीच पावसाने सुरूवात केली आहे त्यामुळे आहे त्यामूळे शेतकरी राजा आनंदी झाला आहे माञ जिल्हा परिषद शाळेमध्ये नेहमी पाणी साचत असल्यामुळे रोगराई पसरण्यास वेळ लागणार नाही घाणीचे साम्राज्य वाढत असल्यामुळे मुलाचं आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सध्या साथीच्या रोगांनी थैमान घातले असुन, डेंग्यू, मलेरिया, हिवताप असे साथीचे आजार पसरत आहे. त्यामुळे संबंधित सरपंच , ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांनी तात्काळ या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी जे ने करून विद्यार्थ्यांचा आरोग्यावर परिणाम होणार नाही मुलांच्या जीवित्वास धोका उद्भवणार नाही.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा