विविध क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्तिमत्व हरवल्याने वाई परिसरात शोककळा
शिवशाही वृत्तसेवा सातारा (जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे)
वाईचे प्रसिद्ध डॉक्टर, लेखक-कवी, अनुवादक, वक्ते, विज्ञान लेखक, नाट्यकर्मी अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व डॉ. शंतनू अभ्यंकर वय 60 यांचे दिनांक १५ ऑगस्ट रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुःखद निधन झाले.
गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सर या आजाराशी लढत होते. अखेर आज त्यांना मृत्यूने गाठले आणि त्यांची लढाई आज अखेर संपली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ते खंदे पुरस्कर्ते होते. मात्र स्वातंत्र्य दिनीच त्यांना मरण यावे हा मोठा दुर्दैवी योगायोग आहे.
---------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा