maharashtra day, workers day, shivshahi news,

अभिजीत पाटलांच्या पुढाकाराने माढा तालुक्यातील उंदरगाव येथे नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

उंदरगाव येथे पहिल्यांदाच ‘खेळ पैठणीचा‘ कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला 

Chairman Abhijit Patil ,Game of Paithni ,  Undergaon , madha , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, माढा (दिनांक १४ ऑगस्ट २०२४)

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्याचा चंग बांधला असून अभिजीत पाटील हे गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत आहेत.

नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त अभिजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने उंदरगाव येथील सहकाऱ्यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले. सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजु यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावावे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावे या अनुषंगाने हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भाऊसाहेब महाडिक-देशमुख, ऋषिकेश तांबिले,  उपसरपंच समाधान मस्के, संजय तांबिले, आबासाहेब साठे, नंदकिशोर आरे, मगन नाईकवारे, सुधीर लवटे, सुरज कांबळे, वाय.जी. भोसले, ग्रामपंचायत सदस्य केवड अमोल धर्मे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.



माढा मतदारसंघ कायम राजकारणात चर्चेचा ठरलेला आहे. मात्र विकासाच्या बाबतीत माढा खूपच मागे असल्याचे दिसते. येथील महिला, तरुण तसेच हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम व त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण काम करणार आहे. आज खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून हजारो माय-माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद मनाला समाधान देणारा आहे. येथील  माता-भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद देत खेळांमध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल आभार मानतो, असे उद्गार यावेळी इचल कारखान्याची चेअरमन अभिजीत पाटील यांनी काढले.

- अभिजीत पाटील,
चेअरमन- श्री विठ्ठलसह.साखर कारखाना

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !