15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने नॉन प्लान रस्ते प्लान मध्ये घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
मतदारसंघांमध्ये वाड्या- वस्त्यावर जाणारे अनेक रस्ते हे निधीपासून वंचित राहत असून केवळ त्याची शासन दप्तरी नोंद नसल्यामुळे त्यावर निधी टाकणे मुश्किल होत आहे, तरी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने नॉन प्लान रस्ते प्लान मध्ये घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून संमती घेऊन ग्रामपंचायत दप्तरी नोंदणी करावी व तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर करावा त्या रस्त्यांना निधी देणे सोयीस्कर होईल असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामस्थांना केले आहेत.
15 ऑगस्ट चा ग्रामसभा मध्ये मतदारसंघातील सर्व गावातील ग्रामस्थांनी आपापल्या गावातील वाड्या-वास्तववर असणाऱ्या रस्त्यांची नोंद ग्रामपंचायतकडे करावी तरच येत्या काळात त्या रस्त्यावर दुरुस्तीसाठी निधी देणे सोपस्कार होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने ही गावातील नॉन प्लान रस्ते प्लान मध्ये घेऊन वरिष्ठ कार्यालयास अहवाल लवकरात लवकर सादर करावा. प्लॅन मधील रस्त्याला मी मागेल तिथे निधी दिला असून सध्या नॉन प्लान रस्त्याच्या निधी मागणीची संख्या जास्त असून त्या रस्त्यांना ही निधी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतने कागदपत्राची पूर्तता करून वाड्यावस्त्यावरच्या रस्त्यांच्या सुधारणासाठी माझ्या कार्यालयाकडे निधीची मागणी करावी असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना केले.
---------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा