गजानन चव्हाण यांनी दिली आर्थिक मदत
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्य जनता सध्या भटकत आहे मिळेल ते काम करून आपला संसार चालवण्याचा प्रयत्न करत आहे पण काहींच्या नशिबी केवळ संघर्षच असते. कितीही हाडाची काडे करून आपल्या लेकरा बाळांना जगवण्याचे काम करत आहेत मात्र काहींना यात अपयश येत असते. नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील सर्व सामान्य मजुरी करून पोट भरत असलेले गणेश सांगे यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या कटुंबाला जगण्यासाठी कुठलाच आधार नसल्याने ते सतेत चिंतेत असायचे. कुटुंबाच्या काळजीने त्यांची तब्येत नेहमी खराब व्हायची. कटुंबाच्या उदरनिर्वाहणासाठी त्यांनी काही जनाकडून उधारी सुद्धा काढली होती पण शेवटी त्यांना आर्थिक मेळ बसत नसल्याने सततच्या चिंतेतून आजारी पडले अन बीपी लो च्या कारणाने त्यांचे निधन झाले.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने दोन चिमुकली मुले असणाऱ्या माऊली समोर दुःखाचा डोंगर कोसळला. लेकरांना जगवायचे कसे हा त्यांच्या पुढे यक्ष प्रश्न निर्माण झाला ही बाब तालुक्यातील सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारे युवा नेते गजानन चव्हाण यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्या कुटुंबाना आधार देण्याचे ठरवले व त्यांनी कुंटूर येथील गणेश सांगे ह्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली अन त्यांच्याने जेवढी शक्य होईल तेवढी मदत त्यांनी कुटुंबियांना केली. यावेळी त्यांच्या सोबत उपस्थित साहेबराव पाटील, विठ्ठल बोरीकर, गंगाधर ईळतगावे, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर इच्छुक नेते हे सध्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत पण त्यांनी अशा गरजवंत कुटुंबाना भेट देऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी मतदार संघातील जनता या इच्छुकांना करत आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा