अपघातात एक जण गंभीर जखमी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
समृध्दी महामार्गावरील अपघाताची मालिका कमी होताना दिसत नाही, त्यामध्ये अजून एक अपघाताची भर, समृद्धी महामार्गावर चैनल क्र.348+300 मुंबई कोरीडोर वर सदर ट्रक ही नागपूरहून मुंबईकडे जात असताना मुंबई कोरीडोर चॅनल क्र.348/300 वर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी होऊन अपघात झाला आहे यात वाहन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली यावरील सविस्तर वृत्त असे कीधं वाहन क्रमांक NL 01N 5989 नागपूरहून मुंबईकडे जात असताना चॅनेल क्रमांक 348/300 वरती वाहन चालक सुरिंद्रर सिंग राहणार रायपूर छत्तीसगड याचे आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने घडलेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला.
असून त्याला पुढील औषध उपचार कामी समृद्धी महामार्गावरील ॲम्बुलन्स द्वारे सिंदखेडराजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे रवाना केले आहे. अपघात ग्रस्त वाहनाला रोडच्या बाजूला करून सेफ्टी कोण लावून महामार्गावरील दोन लाईन मोकळी करून घेतली आहे महामार्गवरील वाहतूक 80 किलोमीटरच्या लेन वर सुरळीत करण्यात आली आहे. जालनाच्या समृद्धीच्या हायड्रा बोलवण्यात आलेले आहे व सदर अपघात ग्रस्त ट्रकला बाजूला घेऊन सेफ्टी कोण लावून वाहतूक सुरळीत करण्यात आलेले आहे यावेळी पीएसआय काळे सोबत पीसी 15 79 खराडे व एम एस एफ जवान या सह डॉक्टर यासीन शहा आणि ड्रायव्हर रमेश दराडे यांनी 108 ॲम्बुलन्स द्वारे जालना शासकीय हॉस्पिटलमध्ये रेफर केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा