maharashtra day, workers day, shivshahi news,

भाजप नेते माजी आमदार मदन भोसले शरद पवार गटात प्रवेश करणार?

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी मदन भोसले यांची भेट घेतली

BJP leader former MLA Madan Bhosle in NCP Sharad Pawar party, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने सातारा जिल्ह्यातील राजकीय पटावर आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे अनेक बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. यामध्ये आज भाजपचे साताऱ्यातील नेते मदन भोसले यांचाही समावेश झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी मदन भोसले यांची भेट घेतली आहे.

मदन भोसले हे शरद पवार गटात गेल्यास वाई मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. जयंत पाटील हे मदन भोसले यांच्या घरातून हसतहसत बाहेर पडले. मात्र, त्यांनी भेटीबाबत काही बोलण्यास नकार दिला. भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत,अशी प्रतिक्रिया माध्यमांना देत जयंत पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. वाई विधानसभा मतदारसंघात माजी आमदार मदन भोसले यांचा राजकीय प्रभाव मोठा असून त्यांचे स्वतंत्र केडर आहे. सहकारातील जाणकार म्हणून त्यांची ख्याती आहे. आमदार मकरंद पाटलांना वाई विधानसभा मध्ये सक्षम पर्याय म्हणून माजी आमदार मदन भोसले निर्णय ठरू शकतात. यामुळेच शरद पवार गटाने माजी आमदार मदनदादा भोसले यांची जवळीक वाढली आहे.

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !