12 मुलींना नेले वैद्यकीय चाचणीसाठी - आणखी संख्या वाढण्याची शक्यता
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सोमवारी मोर्चा
दरम्यान या घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील वरदडी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या त्या नाराधाम वासनांध शिक्षकाला न्यायालयाने येत्या 28 तारखेपर्यंत पाच दिवसाचा पी सी आर दिला आहे त्यामुळे या कालावधीत त्यांनी किती मुलीशी आतापर्यंत गैरव्यवहार केले याची माहिती मिळणार आहे दरम्यान गावात शांतता असून डी वाय एस पी मनीषा कदम आणि त्यांची टीम गावात तळ ठोकून चौकशी करीत आहे दरम्यान आतापर्यंत बारा मुलींना वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले असून यामध्ये आणखी मुलीची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनाला चिड आणणाऱ्या आणि तितकीच घृणास्पद आणि किळसवाण्या या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे राज्यात बदलापूर ची घटना घडली आणि त्यानंतर अशा घटना त मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यातलीच वरदडी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील नराधाम शिक्षक खुशाल शेषराव उगले या मास्तराने आपल्याच शाळेतील इयत्ता चौथीतील अवगत 09-10 वर्षाच्या निरागस मुली सोबत त्यांच्या प्रायव्हेट पार्ट ला हात लावणे त्यांच्या निकर मध्ये हात घालून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले गत एक वर्षापासून या मुली तिसरीत असताना त्याचेही लैंगिक चाळे सुरु होते.
अशा या वासनांध मास्तरास डीवायएसपी मनीषा कदम यांनी बेड्या ठोकून मेहकर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायमूर्तींनी खुशाल उगले या नराधम शिक्षकास 28 तारखेपर्यंत पीसीआर दिला आहे त्यामुळे त्याच्याकडून आतापर्यंत किती मुलींना शिकार बनवले याची माहिती मिळणार आहे दरम्यान या घटनेचा तपास करणाऱ्या जिगरबाज महिला अधिकारी डी वाय एस पी मनीषा कदम यांनी वरदडी खुर्द या गावात जाऊन तळ ठोकला आहे सकाळपासूनच त्यांनी या प्रकरणाची शाळकरी मुलींना विश्वासात घेऊन खोलवर चौकशी करणे सुरू केले आहे दरम्यान आतापर्यंत या चौकशी बारा मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी देऊळगावराजा येथे नेण्यात आले आहे तर आणखी यामध्ये पीडित मुलीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गावात विविध राजकीय लोकांच्या भेटीगाठी सुरू
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच विविध पक्षांच्या राजकीय लोकांनी गावात येऊन भेटीगाठी घेणे सुरू केले आहे सध्या गावात शांतता असून पोलिसांचा पहारा आहे याचे पडसाद उमटणे सुरू झाले असून महाविकास आघाडीचे वतीने नरधाम शिक्षक खुशाल उगले यास तात्काळ फाशी द्या अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा