जिल्हा परिषद शाळेने केला सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
आदमपूर: बिलोली तालुक्यातील मिनकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थिनी व एका शेतकरी कुटुंबातील मुलगी आरती कैलास हातराळकर हीने नुकत्याच घेण्यात आलेल्या एमपीएससी मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत महिला पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने तिचे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने तिचे व तिच्या वडिलांचे ता.२० रोजी यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला.
बिलोली तालुक्यातील मिनकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थीनी आरती कैलास हातराळकर हि स्वतःच्या जिद्दीने व मेहनतीने रात्रंदिवस अभ्यास करत महाराष्ट्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षेत हे संपादन करीत महिला पोलीस उपनिरीक्षक पदास गवसणी घालत आपल्या आई-वडिलांसह गावाचं नाव जिल्हा व राज्य पातळीवर लौकिक केले असल्याने तिचे ती प्राथमिक शिक्षण घेतलेल्या तिच्या जन्मगावीच्या मिनकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने तिचे व तिच्या वडिलांचे येथील मुख्याध्यापक अशोक पेंटे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक पेंटे , सहशिक्षक एच.डी. नाईनवाड ,एस.एम. शेकलोड, पि . एन.शिवाचार्य , बि. बी. येरगट्टे , सहशिक्षिका जे. बी. बिरादार, आर. एल. हांदेशवार यासह विद्यार्थी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा