७ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ - सिंदखेडराजा तालुक्यातील वरदडी बुद्रुक शाळेतील संताप जनक घटना
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
बदलापूर प्रकरणाची घटना ताजी असतानाच तशाच प्रकरणाची पुनरावृत्तीच ठरावी असे घृणास्पद आणि संताप जनक कृत्य मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडले
अवघ्या ८ ते १० वर्ष वयोगटातील ७ अल्पवयीन मुलींसोबत खुशाल शेषराव उगले या नराधाम शिक्षकाने लैंगिक दुष्कर्म केल्याने शिक्षण क्षेत्राला काळमा फासली असून या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात संताप पसरला आहे वाढता जन आक्रोश बघता किनगावराजा पोलीसानी या नराधम शिक्षकाला बेड्या ठोकून पोस्को व ऍट्रॉसिटी अंतर्गत भारतीय न्याय संहिता कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे दरम्यान अवघ्या शिक्षण विभागाने या नराधर्म शिक्षकाला सेवेतून निलंबित केले आहे
या संताप जनक घटनेची माहिती अशी की सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या शाळेमध्ये नऊ शिक्षक कार्यरत आहेत दरम्यान या शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्ष वयोगटातील जवळपास वीस ते बावीस विद्यार्थी आहेत असे असताना या शाळेतील शिक्षक खुशाल उगले हा यातील काही मुली सोबत वर्गात जाऊन त्यांना बोलून घ्यायचा आणि त्यांना हात पाय दाबून घेणे तसेच टीव्ही लावून वर्ग खोली बंद करून मुली सोबत अश्लील चाळे करणे त्यांच्या प्रायव्हेट पार्ट ला हात लावणे निकर मध्ये हात लावणे असे विचित्र प्रकार तो शिक्षक करायचा सदर कृत्य तो मागच्या वर्षीपासून करत होता मात्र यातील मुलींना त्याचे हे प्रकार सहन न झाल्याने काही मुलींनी आपल्या पालकाला घरी जाऊन सांगितले मात्र काही पालकांना गांभीर्याने न घेतल्याने त्याचे हे चाळे वाढतच राहिले. तर काही सुज्ञ पालकांनी याची गंभीर दखल घेत या प्रकरणाची चौकशी केली असता आपल्या मुलीसोबत या शिक्षकाने गैरकृत्य केल्याची लक्षात येतात त्यांच्या मनात प्रचंड संताप आला आणि मुलींना घेऊन थेट शाळेत जाब विचारला मात्र या घटनेची कुणकुण लागतात शाळेतील शिक्षकांनी त्या नराधाम शिक्षकाला शाळेत न येण्याचा सल्ला दिला त्यानंतर पालकांनी एडवोकेट प्रदीप सोनकांबळे तसेच वंचितचे तालुकाध्यक्ष मधुकर शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट घातली त्यांनी लगेच मुलींना घेऊन थेट किनगाव राजा पोलीस स्टेशन गाठले आणि याची माहिती ठाणेदार नरवाडे यांना दिली त्यांनी या घटनेची चौकशी करून आणि सत्यता पडताळून लगेच माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांना दिली. माहिती मिळताच मनिषा कदम यांनी घटनास्थळी येऊन मुलींना चौकशी केली आणि शाळेत जाऊन याबाबतची चौकशी केली त्यानंतर पीडित मुलीचे प्रश्न उत्तरे घेऊन लगेच नराधाम शिक्षक खुशाल उगले यांच्यावर भारतीय न्याय संहिता कायद्यान्वये तसेच पोस्को आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत सदर प्रकरणी किनगाव राजा ठाणेदार विनोद नरवाडे पोलीस कर्मचारी अब्दुल परसू वाले खुशाल गीते आशिष सवडे शिवाजी बारगजे विष्णू मुंडे झाकीर चौधरी यांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी मनीषा कदम करीत आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव जमून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करत केली.
नरधाम खुशाल उगले हा शिक्षक पांगरी उगले येथील रहिवासी आहे विशेष म्हणजे दररोज शाळेत जाताना तो देवाचे दर्शन करून जायचं मात्र शाळेत गेल्यावर तो अत्यंत अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करायचा त्याचे हे चाळे मागच्या वर्षीपासून सुरू होते सदर शिक्षक अवघ्या दोन वर्षानंतर रिटायर होणार होता मात्र म्हातार चळ लागल्याने त्या नराधम शिक्षकाचे अश्लील चाळे वाढले आणि आता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकले आहेत प्रथमदर्शनी तीन मुलींनीच इन कॅमेरा प्रश्नोत्तरे दिल्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे यावेळी दक्षता समितीच्या प्रतिभा राजे जाधव सुनीता राजुरे उपस्थित होत्या यावेळी सात मुली सोबत त्यांनी गैर कृत्य केले तर जवळपास बारा मुली त्याच्या या गैरवृत्त्याला बळी पडल्याचे काही पालकाचे म्हणणे आहे चौकशीनंतर त्याच्या कडून मोठ्या प्रमाणात माहिती मिळू शकते या कृत्यामध्ये जवळपास वीस वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
नऊ शिक्षक मात्र एकही महिला शिक्षक नाही
वरदडी बुद्रुक येथील शाळेत नऊ शिक्षक आहेत मात्र या शिक्षकांमध्ये एकही महिला शिक्षिका नाहीत त्यामुळे यां नराधाम शिक्षकाचे मनोधैर्य वाढले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा