बाल गोपाळ व महिलांनी केला आनंद उत्साह साजरा
शिवशाही वृत्तसेवा, सोयगाव, (प्रतिनिधि रईस शेख)
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यात आदिवासी लोकनायक, क्रांतीवीर बिरसांडा मुसांडा,तंट्या भिल,राघोजी भांगरे व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रा.जीवन कोलते पाटील, जब्बार डी तडवी, गणेश खैरे व माजी ग्रा.प.सदस्य फकीराभाऊ तडवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रा जीवन कोलते पाटील यांनी जागतिक दिना विषयी थोडक्यात माहिती सांगितली.
'एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान', 'जय जोहार-जय आदिवासी आम्ही वनवासी नाही आदिवासी आहे आमची संस्कृती आमचा अभिमान-मी आदिवासी स्वाभिमान', 'जय बिरसा- जय राघजी' असे थोडक्यात प्रा कोलते पाटील यांनी मनोगत व्यक्त केले नंतर ट्रॅक्टर मधे या महापुरुषांचे प्रतिमा ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली.गावात प्रत्येक चौक सजविण्यात आले होते.
यावेळी प्रा .जीवन कोलते पाटील,प्रा योगेश चोपडे,उपसरपंच मो आरिफ मो लुखमान,ग्रा.प.सदस्य सुपडाबाई फकीरा तडवी, गणेश खैरे, जब्बार डी तडवी,,जाफर ददेखा तडवी,अफसर तडवी,शेरखा तडवी,आशरफ तडवी,रजू तडवी,इसा तडवी, जावेद तडवी,शरीफ तडवी,गफ्फार तडवी,मनोर तडवी,सलीम तडवी,हारुण तडवी,कदीर एस तडवी,सत्तार तडवी, तसेच पत्रकार बंन्धू उपसंपादक गोकुळसिंग राजपूत, जब्बार डी तडवी, जब्बार एस तडवी, रहीम खान पठाण, दिलीप देशमुख, सुनील चोरमारे, शंकर खराटे व आदिवासी महिला, आदिवासी बांधव,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी पत्रकार जब्बार डी तडवी माहिती यांनी बोलताना दिली.मिरवणूकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सपोनि प्रफुल्ल साबळे फर्दापूर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार मिरखाॅ तडवी,पो.काॅ.शिवदास गोपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा