गोविंदा रे गोपाळा च्या आवाजाने परिसर भारावला
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
दिनांक 28 ऑगस्ट 2024 मंगळवार रोजी पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहीहंडी कार्यक्रम पार पडला, याप्रसंगी इस्कॉन टेम्पल पंढरपूरचे व्हाइस प्रेसिडेंट धनुर्धर अर्जुनदास, श्री कृष्ण देवदास सांगोला तसेच राघवेंद्रदास, रमानुजदास व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता मोहोळकर यांच्या हस्ते राधा कृष्णाच्या प्रतिमेचे आणि दहीहंडीचे पूजन करण्यात आले. यावेळी अर्जुनदास व रामानुजदास यांनी कृष्णजन्मा विषयी आणि भगवद्गीते विषयी माहिती सांगितली. प्रशालेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी राधा व कृष्णाच्या वेशभूषेत आले होते.
प्रशालेतील गोविंदांनी मोठ्या उत्साहाने दहीहंडी फोडली. विद्यार्थिनींनी कृष्णभक्ती गीतांवर नृत्य व नाटक सादर केले. त्यानंतर काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. क्षितिज मोहोळकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली शिंदे यांनी केले. मिनाक्षी गायकवाड़, शिल्पा कुलकर्णी, सायली पोरे, श्रद्धा दुरुगकर, निशा जाधव, हर्षाज्ञी करंडे, कविता जगताप, कल्पना हुच्चे, मुग्धा चौबे, रोहिणी काळे तसेच शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा