आवळा, जांभूळ, फणस अशी विविध प्रकारची ४५० झाडे लावण्यात आली
शिवशाही वृतसेवा, शिरूर तालुका प्रतिनिधी; फैजल पठाण, शिरूर -पुणे
रांजणगाव एमआयडीसी येथील मुरली कृष्णा फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडातून रामलिंग ग्रामपंचायत साठी आवळा, जांभूळ, फणस अशी विविध प्रकारची ४५० झाडे देण्यात आली दिनांक२७/०८/२०२४ रोजी रामलिंग ग्रामपंचायत येथील घोटी मळा ,रामलिंग मंदिर परिसर या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी कंपनीचे सी एस आर सल्लागार वेंकटेश सर, एच आर वैभव करपे, अकाउंट हेड सुप्रिया शिंदे, रूपाली भोईरकर (सालके), सारिका वाळके, हरमिला यादव, पायल काळे, ऋतुजा पिंगळे, स्नेहा पळसकर ,राजन बोरुडे, अविनाश गाडे, संतोष बसाटे तसेच रामलिंग ग्रामपंचायतीच्या सरपंच कुमारी शिल्पा गायकवाड, उपसरपंच बाबाजी वर्पे, आदर्श सरपंच अरुणराव घावटे, ग्राहक पंचायत अध्यक्ष दिनकर साबळे, माजी सरपंच नामदेव जाधव, माजी उपसरपंच भरत बोराडे, संजय शिंदे, सागर घावटे ,माजी सरपंच सोमनाथ घावटे, ग्रामपंचायत सदस्य लीलाताई दौंडकर, स्वातीताई घावटे, ग्रामपंचायतचे मुख्य लिपिक शिवाजी महाजन तसेच रामलिंग ग्रामपंचायतचे कर्मचारी वृंद व इतर मान्यवर उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा