उपविभागीय अधिकारी चिंचणे व तहसिलदार सौंदाणे यांनी उपोषण सोडण्याचा आदेश दिला
शिवशाही वृतसेवा , पारनेर जिल्हा प्रतिनिधी, सुदाम दरेकर
अळकुटी येथे गेली २ दिवसां पासून मंजुर झालेल्या घरकुलांसाठी बेघर वासियांच्या करीता नवीन गावठाणा मध्ये जागा मिळण्याबाबत उपोषण सुरू होते प्रशासनाच्या उडवा उडवीच्या उत्तरा मुळे गेली ३ ते ४ वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता, सदर कामाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालून हा प्रश्न १५ दिवसानंतर मार्गी लावण्याचे महसूल प्रशासनाला दिल्याने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले आहे .
पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांची पारनेर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष अतुल माने यांनी या प्रश्नावर लक्ष वेधल्याने त्यांनी नगर - पारनेर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी चिंचणे व पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्याशी चर्चा करून हा घरकुलासाठी च्या भूखंडाचा प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावण्याचा आदेश दिला असून तसे अळकुटी येथे उपोषण स्थळी जावून जिल्हा भाजपा कार्यकारिणी सदस्य किसनराव शिंदे , उपसरपंच बाळासाहेब धोत्रे व पारनेर तालुका भाजपाचे उपाध्यक्ष अतुल माने यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषण कर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून १५ दिवसांत मार्गी लावण्याचा शब्द देवून उपोषण सोडण्याचा आदेश दिल्याने उपविभागीय अधिकारी चिंचणे व तहसिलदार सौंदाणे यांनी रात्री उशिरा अळकुटी येथे उपोषण कर्त्यांची भेट घेवून हा प्रश्न येत्या १५ दिवस मार्गी लावण्याचा शब्द दिला . या प्रसंगी उपोषण कर्त्यांना उपविभागीय अधिकारी चिंचणे यांच्या हस्ते फळांचा रस देवून उपोषण सोडण्यात आले .
या भूखंडाचा प्रश्ना संदर्भात भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी सदस्य किसनराव शिंदे , लाडकी बहिण योजनेचे पारनेर तालुका अध्यक्ष सुनिलराव थोरात , भाजपा तालुका उपाध्यक्ष अतुल माने , उपसरपंच बाळासाहेब धोत्रे , शिवसेना शाखा प्रमुख अशोक शिरोळे यांनी कागदपत्राची पूर्तता करून महसूल प्रशासनाला निवेदन दिले होते , तरी देखील अळकुटी तील ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आमरण उपोषणा सारखे आंदोलन हाती घेवून हा प्रश्न शासन दरबारी मांडावा लागला , या सारखे दुर्देव काय असू शकते ?
अळकुटी येथील घरकुलाचा भुखंडाचा प्रश्न पारनेर भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अतुल माने यांनी पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधल्याने त्यांनी सक्त आदेश दिल्याने महसूल च्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडविण्याचा शब्द द्यावा लागला , या सारखे दुर्देव काय ? एखादा अतुल मानेंसारखा तालुका पदाधिकारी पोट तिडकीने हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो , तर पारनेर तहसिल कार्यालयात जमीन महसूल चे अनेक प्रश्ने वर्षानुवर्षे धुळखात पडून असून त्याकडे हे महसूल प्रशासन वेळेची तत्परता दाखवून कधी भूमिहिनांना जमीन व जागा देतील . पण प्रशासन अजून ही झोपेत असले वागत असल्याने फार मोठ्या प्रमाणावर प्रकरणे पडून आहेत , मग सामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे , अधिकारी ही दुरुत्तरे देतात ?
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा