मंगळवेढ्यात आमदार समाधान आवताडे यांना भेटून केली शिफारिश करण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी शिफारिश करावी अशी मागणी करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची भेट घेतली आहे.
पंढरपूर तालुका हा चार विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे. तालुक्यातील गावे माढा, सांगोला, मोहोळ आणि मंगळवेढा मतदारसंघाला जोडलेली आहेत. त्यापैकी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील 22 गावातील काळे गटाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार समाधान आवताडे यांची भेट घेऊन चेअरमन कल्याण काळे यांना विधान परिषदेसाठी शिफारिश करावी अशी आग्रही मागणी केली आहे. तसेच विधानसभेच्या वेळी काळे गटाची संपूर्ण ताकद आमदार समाधान आवताडे यांच्या मागे उभी करण्याचे आश्वासन देखील दिले आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या उमेदवारीचा निर्णय हा ज्या त्या पक्षाचे प्रमुख नेते मंडळी घेणार असतात. तरीही आम्ही चार आमदार चर्चा करून आमच्या बाजूने कल्याणराव काळे यांची शिफारस करु असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
यावेळी सहकार शिरोमणी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, सहकार शिरोमणी चे संचालक मोहन नागटिळक, तानाजी सरदार,जयनाना देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षाराणी शिंदे, सहकार शिरोमणी चे माजी संचालक महादेव देठे,तानाजी जाधव, कोर्टी गाव चे उपसरपंच महेश येडगे, जोतीराम पोरे,महादेव सुर्यवंशी, लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग मोरे, रामभाऊ बागल, विक्रम बागल,प्रदीप बागल, शिवाजी जाधव,अनिल नाना नागटिळक, सोमनाथ पोरे, बजरंग देठे व विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा