India Republic Day, shivshahi news,

मंगळवेढा शहर व परिसरात मोटरसायकल चोऱ्या करणारा इसम जेरबंद

तीन मोटरसायकल एक लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त - पोलीस निरीक्षक महेश ढवान यांची धडक कारवाई
Motorcycle thief jailed, mangalwedha, solapur, police, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
मंगळवेढा शहरात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येताच नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी चोरीच्या तपासासाठी डी.बी.पथक तयार करुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता
यामध्ये डी. बी. पथकाला १ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या जुन्या वापरत्या ३ मोटर सायकली शोध घेण्यात यश आले आहे.मंगळवेढा शहरात भर दिवसा मोटर सायकली गायब झाल्याच्या तक्रारी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. 

या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीसांचे डी.बी. पथक नेमण्यात आले असून यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापट, पोलीस अंमलदार महेश पोरे, वैभव घायाळ, सुरज देशमुख, कृष्णा जाधव यांनी तांत्रीक विश्लेषणाव्दारे तपास करुन गोपनीय माहितीच्या आधारे ३ मोटर सायकली चोरीचे गुन्हे उघड करण्यात त्यांना यश आले आहे. आरोपी सिध्देश्वर मारुती कदम (रा. मुढवी) याच्याकडे चोरीच्या मोटर सायकली असल्याची माहिती मिळताच सदर आरोपीस ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता ३ मोटर सायकली मिळून आल्या.

यामध्ये फौजदार चावडी सोलापूर शहर हद्दीमधील एम. १३ ए.आर.५४१४ ही ३० हजार रुपये किंमतीची, एम.एच.१३ सी.एम. ९१०१ ४५ हजार रुपये किंमतीची, एम.एच.१३ बी.ए.९५५९ ३० हजार रुपये किंमतीची, मंगळवेढा शहरातील दोन असा एकूण १ लाख ५ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरपदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी ही विशेष कामगिरी बजावली आहे.

दरम्यान यातील फिर्यादी संजय दत्तू हे वेल्डींग व्यवसायिक असून त्यांची मोटर सायकल २२ जून रोजी दुपारी ३ वाजता डोळ्यादेखत सदर चोरटयाने हातोहात पळविल्याची घटना घडली होती.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !