India Republic Day, shivshahi news,

राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हा संपर्क प्रमुख करत होता अवैध देशी दारू विक्री

राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा यांनी केली धडक कारवाई
rashtriy Samaj Party, mahadev jankar, Illegal sale of country liquor, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
महायुतीचा एक घटक पक्ष   म्हणून ओळखला जाणारा पक्ष म्हणजे महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता याच पक्षाच्या बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुखाचा प्रताप बघून तुम्हाला धक्काच बसेल, तर होय तुम्ही वर जे वाचले ते खरे आहे  सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा या गावात  गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू होती दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर होते आणि दारू विक्री करणारा होता राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हा संपर्कप्रमुख गावातील प्रतिष्ठित मंडळींनी एकत्र येऊन त्याला दारू विक्री बंद करण्याची विनंती देखील केली होती 

पण राजकीय वरदहस्त असल्या कारणाने पोलीस देखील लक्ष द्यायला तयार   पण गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजू नागरे यांना  गावातील ९० टक्के  भांडण हे दारूमुळे होत असल्याने त्यांनी आक्रमक पवित्राच घेतला  गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे तक्रार करून  त्यांना पाचारण करण्यात आले राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा यांनी  अतुल भुसारी याच्या घरी धाड टाकत एकूण ३३६०/- रुपये किमतीचा ८.६४ लिटर दारू साठा जप्त ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कार्यालय चिखली येथील निरीक्षक रा.ने.रोकडे यांच्या नेतृत्वात एस.बी. रोटे, सहा-दुय्यम निरीक्षक जी. व्हि .पहाडे, जवान ए.पी तीवाने  जवान एस.डि. जाधव यांनी केली

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. शिवशाही न्यूज वेबसाईट भारी आहे

    ReplyDelete

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !