दामाजी कारखाना चौकात उचेठाणकडे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या येन्ट्रा गाडीला हात दाखवून पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते वाहन न थांबता भरधाव वेगाने गेल्यावर पुढे काही अंतरावर जावून पलटी झाल्याने हा अपघात झाला.पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला नाही या घटनेबाबत संबधित वाहन चांलकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
भीमा व माण नदीतील अवैध वाळू उपसा आणि वाळू वाहतूक थांबवण्याची नागरिकांकडून मागणी
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे )
मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पोलिसांना पाहताच वेगाने पळाल्याने पलटी झाले. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर अन्य एक जखमी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वाहन चालक सूरज शहाजी चव्हाण (रा.सांगोला), गणेश भाऊसाहेब मस्के, देवल शक्तिमान उघडे, गणेश दत्तात्रय मस्के (रा. शिरगांव), वाहन मालक चैतन्य सुभाष गायकवाड (रा.ओझेवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी पोलीस नाईक ईश्वर दुधाळ व पोलीस हवालदार श्रीमंत पवार, पोलीस अंमलदार कदम हे दिनांक 22 रोजी 4 वाजता पेट्रोलिंग करीत उचेठाण परिसरात आले असता त्यांना मुढवी येथून एक अवैद्य वाळू वाहतूक करणारे वाहन आले होते. यावेळी कारखाना कारखाना चौकात पोलीस थांबले असता त्यांना पाहून पांढऱ्या रंगाचे चार चाकी वाहन येत असल्याचे पोलिसांना वाळू वाहतुकीचा संशय आल्याने वाहन थांबविण्याचा इशारा केला मात्र ते वाहन पुढे तसेच उचेठाण गावच्या दिशेने जात असताना पोलिसांच्या भीतीपोटी सदर वाळूचे वाहन गडदे वस्ती येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून पलटी झाले होते.
पोलीसांनी सदर घटनेच्या ठिकाणी पाहणी केल्यावर तीन इसम जखमी अवस्थेत रोडवर पडले होते त्यांचे डोकीस, पायास, हातास जखमा झाल्या होत्या. सदर इसमांची चौकशी केली असता वाहन चालक सूरज चव्हाण व हौद्यात पाठीमागे बसलेले गणेश दत्तात्रय मस्के, देवल शक्तिमान उघडे, गणेश भाऊसाहेब मस्के, वाहन मालक चैतन्य सुभाष गायकवाड असे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी 2 लाखाचा चार चाकी वाहन, 2 हजार किंमतीची अर्धा ब्रास वाळू असा एकूण 2 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान भीमा व माण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक चालते. या वाहनाकडून एक पोलीस कर्मचारी मंथली गोळा करीत असल्याची खमंग चर्चा अपघातस्थळी रंगली होती. तो मंथली गोळा करणारा कोण? याचा कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी कसून शोध घेवून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी घटनास्थळी नागरिकामधून होत होती. ही घटना वसूलीच्या नादातूनच झाल्याची चर्चा उचेठाण परिसरात सुरु आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा