पंढरपूर येथे 31 जुलैला विशेष शिबीराचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (जिमाका)
तालुक्यातील भटके विमुक्तांना विविध प्रकारचे दाखले, आधारकार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र आदी दाखले देण्यासाठी बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सांस्कृतीक भवन, उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर विभाग पंढरपूर येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे.
यावेळी जात प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, जन्म दाखला, आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड व सामाजिक योजना या योजनांचा नागरीकांना लाभ देण्यात येणार आहे. तरी पंढरपूर तालक्यातील नागरीकांनी या विशेष शिबीरचा लाभ घ्यावा असे आवाहनही तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे.
--------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा