कुस्त्यांचे मैदान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मंगळवेढा व माढा मतदारसंघात झंजावाती दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सकाळी ९:०० वाजता वाढदिवसानिमित्त ते श्री विठ्ठल मंदिर नामदेव पायरी येथे पूजा करून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करुन आशीर्वाद घेतील. त्यानंतर टेंभुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून अरण येथील संतशिरोमणी सावता माळी मंदिरात दर्शन घेणार आहेत.
११:०० वाजता माढा येथील माढेश्वरी देवीचे दर्शन करून, दुपारी २:०० वाजता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कै. औदुंबर अण्णा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. दुपारी ४:०० वाजता मंगळवेढा येथे संत दामाजी मंदिर, जय भवानी मंदिर, संत चोखामेळा, व पीर साहेब दर्गा येथे दर्शन करतील. त्यानंतर सायंकाळी ७:०० वाजल्यापासून पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. त्याचबरोबर चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, कुस्त्यांचे जंगी मैदान, वृक्षारोपण, व इतर विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा