तहसिलदार अजित पाटील यांनी दिली माहिती
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
१ ऑगस्ट महसुल दिन व शासनाने आयोजित केलेला महसुल पंधरवडा शुभारंभ तसेच विविध विभागाकडुन राबविल्या जाणा-या शासनाच्या योजनांचे आयोजन १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाचे महसुल पंधरवडयातील विविध विभागातील कामाचे नियोजन प्रत्त्येक विभागाकडुन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ किसनवीर सभागृह पंचायत समिती खंडाळा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेने सर्व विभागांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत करण्यात येणार असलयाचे तहसिलदार यांनी सांगितले.
या पंधरवडयामध्ये शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी लोकोपयोगी व समाजउपयोगी व्यक्तीगत तसेच सार्वजनिक लाभाची कामे सर्व विभागाकडुन केली जाणार आहे. या पंधरवडयामध्ये महसुल विभागाकडून केली जाणारी कामे विविध दाखले दिव्यांग/अपंग, विविध योजनांची प्रकरणे, कार्यालयीन स्वच्छता अधिकारी कर्मचारी यांचेबरोबर संवाद, माजी सैनिक सर्वस्तरातील युवा, महिला, शेतकरी, नागरीक यांचेकरीता युवा कार्य प्रशिक्षण, शेती विषयक मार्गदर्शन यासारखे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचा खंडाळा तालुक्यातील सर्व नागरीकांनी सहभाग घेऊन शासनाचा महत्वकांशी कार्यक्रम यशस्वी करावा असे अवाहन श्री. अजित पाटील, तहसिलदार खंडाळा यांनी केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा