happy new year 2025, shivshahi news,

 

चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली - वाचवले बस मधील प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे प्राण

कराड- चोरजवाडी बसला भिषण अपघात - पाच विद्यार्थी जखमी - सुदैवाने जीवितहानी नाही

ST bus accident, five student injured, no casualties, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

हिगनोळे ता. कराड गावच्या हद्दीत एसटी बसचा स्टेरींग राॅड  तुटल्याने बस नाल्यात आदळून अपघात झाल्याची घटना बुधवारी ३१ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान एसटी चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे हिंगनोळे येथील ग्रामस्थांनी सांगितले. चोरजवाडी ते कराड बसला अपघात झाल्याची ही घटना घडली. 

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, हिंगनोळे येथे झरे वस्ती समोर चोरे ते उंब्रज येणाऱ्या मार्गावर एसटी बसला अपघात झाला. सकाळची वेळ असल्याने उंब्रज येथे काॅलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी एसटी फुल्ल भरली होती. हिंगनोळे गावच्या हद्दीत एसटी आल्यानंतर एसटीचा स्टेरींग राॅड अचानक तुटला त्यामुळे भीतीदायक चित्र निर्माण झाले. एसटीत विद्यार्थ्याचा एकच गोंधळ उडाला. मात्र प्रसंगावधान राखून चालकाने गाडी नाल्यात ओढली. त्यामुळे बस पलटी झाली नाही. व सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.  अपघात पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उंब्रज येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चालकाच्या या कामगारिचे घटनास्थळी आलेल्या ग्रामस्थांनी कौतुक केले.

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !