शिरूर तालुक्यातील तरुणाची पोलीस प्रशासनाला आर्त हाक
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
दि. २१/०७/२०२४ रोजी गोविंद आबासाहेब वाघमारे हे बाहेरगावी असताना त्यांची शिरूर येथील जागा गट नंबर ९८५/२/१ या जागेवर पत्र्याचे घर बांधलेले असून, नितीन मच्छिंद्र पाचरणे व अनिल यमाजी पोटावळे व इतर दहा ते पंधरा जणांनी दमदाटी करून तसेच दहशत निर्माण करून जेसीबीच्या साह्याने गोविंद वाघमारे यांच्या गैरहजरीमध्ये त्या ठिकाणच्या त्यांच्या कामगारांना दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करून माझे पत्र्याचे घर उध्वस्त केले. ही माहिती मिळताच मी 112 ला कॉल केल्यावर शिरूर पोलीस स्टेशनचे गणेश पालवे त्या ठिकाणी आले असता, सदर लोक त्या ठिकाणाहून निघून गेले होते.
याबाबत तक्रार देण्यासाठी मी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता, ठाणे अंमलदार यांनी तुम्ही पी आय साहेबांना भेटा मगच तुमची तक्रार घेऊ असे म्हटले त्याप्रमाणे मी पीआय साहेबांना भेटलो पण त्यांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्यामुळे व ते दोन-तीन दिवस भेटलेच नाही. त्यामुळे मी डी. वाय. एस. पी. रांजणगाव एमआयडीसी यांना भेटून माझी सर्व हकीगत सांगितल्यानंतर त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पीआय गुंजवटे यांना बोलवुन घेतले व गुन्हा दाखल करण्यास सांगितले, त्यानंतर पुन्हा मी शिरूर पोलीस स्टेशनला गेलो असता फक्त एन.सी. दाखल करून घेतली, मी पीआय साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता उलट त्यांनीच मला दमदाटी करत तू कोण हे ठरवणार? जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर तुलाच गुन्ह्यात टाकीन ? अशी धमकी दिली.
माझे घर पाडणाऱ्या इसमांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत असे वाटते. तरी या प्रकरणांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित व्यक्तीवर योग्य गुन्हा दाखल करून तसेच या कामे दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा मी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करून व न्याय नाही मिळाला तर मी आत्मदहन करेल व याची सर्वस्व जबाबदारी शिरूर पोलीस स्टेशनचे पीआय गुंजवटे यांची राहील असे गोविंद वाघमारे यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.
यावेळी वाघमारे म्हणाले की, मी घेतलेली जागा ही एक वर्षांपूर्वी खरेदी केलेली आहे आणि माझे तेथील पत्रा घर सुद्धा एक वर्षापासून आहे त्या ठिकाणी माझे महावितरण लाईटचे कनेक्शन सुद्धा आहे हे नितीन पाचरणे व अनिल पोटावळे यांना माहीत असून त्यांनी त्याच जागेची दिशा दाखवून व इतर लोकांकडून ती जागा विकत घेतली या प्रक्रियेसाठी मला रितसर न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागेल माननीय कोर्टाचा जो निर्णय/निकाल असेल तो मी मान्य करेल किंवा विरोधात गेला तर मला अपील करण्याची संधीही मिळेल परंतु हे सर्व होण्या अगोदरच दहशत व शिविगाळ करून जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न ही लोक करत आहेत. या घटनेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून शिरूर पोलीस गुन्हा दाखल करणार का ? गुंडांना पाठीशी घालणार असा प्रश्न तक्रारदार तरुणासह नागरिकांनाही पडला आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा