नायगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या महान प्रतिभावंताचे प्रगल्भ साहित्य सर्व जाती धर्म समावेशक आहे. याची जाणीव बहुजन समाजाला होत आहे अण्णाभाऊच्या जातीवर नव्हे तर विचारावर प्रेम करणारी युवा कार्यकर्ते यांनी नायगाव शासकीय ग्रामीण रुग्णालयात अण्णाभाऊंची जयंती साजरी न केल्याने येथील सबंधित अधिकाऱ्याचा निषेध करून जयंती साजरी केली.
सर्व शासकीय प्रशासकीय कार्यालयात सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे या महामानवासह देशातील राष्ट्रपुरुष महान समाज सुधारक यांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचे आदेश शासनाने दिले असूनही नायगाव ग्रामीण रुग्णालयातील एस ओ कार्यालयीन अधिकारी एन.व्ही. दाबके यांनी अण्णाभाऊची एक ऑगस्ट रोजी सर्वत्र जयंती साजरी होत असतानाही आपली तब्येत ठीक नाही म्हणून जयंती साजरी न केल्याने ही गोष्ट काही कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दाबके यांना प्रश्न केला की, आपण सदर महामानवाची जयंती आज साजरी न करण्याचे कारण काय, तेव्हा दाबके यांनी माझी तब्येत ठीक नाही, कर्मचारी कामात आहेत, दुपारनंतर बघू असे बोलून वेळ मारून नेत असताना उपस्थित सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भालेराव नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण, काँग्रेसचे युवा कार्यकर्ते माणिक पाटील चव्हाण नगरसेवक शरद भालेराव अजिंक्य पाटील कल्याण साईनाथ नामवाडे यांनी सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठेचा विजय असो, अण्णाभाऊची जयंती साजरी न करणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध असो अशा प्रचंड घोषणाबाजी केली तेव्हा तिथे तात्काळ वैद्यकीय अधीक्षक पी बी सोनकांबळे हे देखील हजर झाले कार्यकर्त्यांनीच अण्णाभाऊंची प्रतिमा व पुष्पहार आणून जयंती साजरी केली यावेळी गणेश भालेराव, अविनाश भालेराव, कपिल गायकवाड, शिवराज भालेराव, दिलीप इंगळे यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा