maharashtra day, workers day, shivshahi news,

भुईंज मधील खालचे चाहूर येथील नवीन बंधारा भरला

आमदार मकरंद पाटील यांच्या फंडातून झाला आहे बंधारा

The dam at Chahoor was filled, mla makarand patil, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधि शुभम कोदे)

भुईंज ता.वाई येथील खालचे चाहूर ओढ्यातील पाणी बंधारा नसल्यामुळे पावसाळ्यात वाहून जात असे त्यामुळे   उन्हाळ्यात विहिरींची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावत होती. आणि याची तीव्रता मागील वर्षी खूपच प्रकर्षाने जाणवली त्या मुळे या वरती उपाययोजना करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून उपसरपंच शुभम पवार ,भरत भोसले , निशिगंधा भोसले, अमित लोखंडे या ग्रामपंचायत सदस्यांनी   पाठपुरावा करून आ. मकरंद पाटील यांच्याकडे बंधारा बांधून देण्याची मागणी केली . या मागणीची आ. मकरंद पाटील यांनी दखल घेऊन  ओढ्यावर बंधारा बांधून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची  पूर्तता करून  खालचे चाहूर येथे ओढ्यावर  बंधारा बांधण्यात आला.  

गेल्या आठ दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे वाहून जाणारे ओढ्याचे पाणी  बांधऱ्यात साठल्या  मुळे  तो पूर्ण पणे भरला असून त्याच्या सांडव्यवरून पाणी वाहत आहे  मागिल वर्षी  दुष्काळाची झळ या भागातील  शेतकरी वर्गाला सोसावी लागली होती विहिरींची पाणी पातळी खालावल्यामुळे  शेतकरी वर्ग खूप चिंतीत झाला होता. त्यामुळे ओढ्यावर  बंधारा  बांधण्यात यावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. 

आमदार  मकरंद  पाटील यांनी आपल्या फंडातून  तीस लाख  रुपये एवढा  निधी दिल्यामुळे खालचे चाहूर येथे बंधारा बांधण्यात आला.  यापुढे  ओढ्यातून वाहून जाणारे पाणी  आडवले जाऊन बारा महिने ओढा वाहता राहील आणि  या भागातील विहिरींची पाणी पातळी कमी होणार नाही. तसेच पाणी आडवा  पाणी जिरवा  ही संकल्पना आणखी लोकांन पर्यंत  पोहोचून त्याचे महत्त्व त्याना समजेल.  आपल्या मागणीची   दखल घेऊन  ओढ्यावर बंधारा  बांधून दिल्यामुळे  येथील ग्रामस्थांनी आ. मकरंद  पाटील यांचे  आभार मानले.

ग्रामस्थांनी मानले आमदार मकरंद पाटलांचे आभार

या बंधाऱ्यामुळे शेजारील विहिरींची पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार असून याचा फायदा आम्हा शेतकरी वर्गांला होणार आहे. त्यामुळे आ.मकरंद पाटील यांचे विशेष आभार ग्रामस्थ  संतोष भोसले यांनी मानले

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !