मंत्री मकरंद पाटलांचा बालेकिल्ला ढासळला - वाई नगरपालिकेत भाजपची मुसंडी

नगरपालिकेचा निकाल मंत्री मकरंद पाटलांना आत्मपरीक्षण करायला लावणारा

BJP wins, anil sawant, makrand Patil, wai, municipality election, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

नगराध्यक्ष पदासह भाजप १० सदस्य, राष्ट्रवादी १२ सदस्य, अपक्ष एक उमेदवार आले निवडून

वाई नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह 10 उमेदवार निवडुन आणले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनविरोधसह 12 उमेदवार निवडून आले. सर्वसाधारण प्रभाग 9 ब च्या जागेवर नागरीकांचा मागास प्रवर्गचा अपक्ष उमेदवार सुशील खरात विजयी झाला.

वाई नगरपालिकेत राजकीय खेळी फत्ते, भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर 

भाजपाने वाई नगरपालिकेची निवडणुक प्रतिष्ठेची बनविली होती. उमेदवारांच्या प्रचारासाठी महसुलमंत्री ना. चंद्रकांत बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, ग्राम विकास मंत्री  ना. जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरभी भोसले, दिपक ननावरे आदींनी सहभाग घेतला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मदत व पुर्नवसन मंत्री ना. मकरंद पाटील हे एकटे खिंड लढवित होते. त्यांना खासदार नितीन पाटील, प्रतापराव पवार आदी सहकार्य करीत होते. शिवसेनेच्या उमेदवारांनसाठी पालकमंत्री व पर्यटन मंत्री ना. शंभुराजे देसाई यांनीही हजेरी लावली होती परंतू त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. 

भाजपच्या अनिल सावंत यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. नितीन कदम यांचा २१६० मतांनी केला पराजय

वाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अनिल सावंत यांना 12281 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन कदम यांना 10122 मते मिळाली. 2159 मताधिक्याने भाजपाचे अनिल सावंत विजयी झाले. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदीप जायगुडे यांना 324 मते, अपक्ष दिपक जाधव यांना 272 मते मिळाली. तर 184 मतदारांनी नोटाला मतदान केले.

नगराध्यक्षपदासाठी प्रभाग 2 मध्ये अनिल सावंत यांना 416 मताधिक्य, 5 मध्ये 477 मताधिक्य, 6 मध्ये 188 मताधिक्य, 7 मध्ये 573 मताधिक्य, 8 मध्ये 159 मताधिक्य, 10 मध्ये 143 मताधिक्य, 11 मध्ये 1037 मताधिक्य मिळाले. डॉ. नितीन कदम यांना प्रभाग 1 मध्ये 72 मताधिक्य, प्रभाग 3 मध्ये 237 मताधिक्य, 4 मध्ये 299 मताधिक्य, 9 मध्ये 225 मताधिक्य, प्रभाग एक मध्ये भाजपाच्या अपर्णा संतोष जमदाडे  यांना 1068 मते पडली तर राष्ट्रवादीच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी सविता दिलीप हगीर यांना 1029 मते पडली भाजपाच्या जमदाडे 39 मताधिक्याने विजयी, प्रभाग एक ब मध्ये भाजपाचे प्रसाद बनकर यांना 1153 मते पडली तर राष्ट्रवादीचे संदीप नायकवडी यांना 811 मते पडली. भाजपाचे बनकर 342 मताधिक्याने विजयी झाले. माया चौधरी यांना 149 मते  पडली. प्रभाग दोन राष्ट्रवादीचे घनश्याम चक्के यांना 1131 मते पडली, तर भाजपाचे ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी यांना 1042 मते पडली. 89 मताधिक्याने राष्ट्रवादीचे चक्के विजयी झाले. प्रभाग दोन ब मध्ये  भाजपाच्या पद्मा संग्राम जाधव-पाडळे यांना 1413 मते पडली तर  राष्ट्रवादीच्या सुप्रिया महेंद्र धनवे यांना 768 मते पडली, 645 मताधिक्याने भाजपाच्या जाधव-पाडळे विजयी झाल्या.

प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादीचे संदीप जावळे यांना 1285 मते पडली तर भाजपाचे विपीन वैराट यांना 706 मते पडली.  579 मताधिक्याने राष्ट्रवादीचे जावळे विजयी झाले. सतीश वैराट 327 तर राकेश मोरे यांना 105 मते पडली. तीन ब मध्ये राष्ट्रवादीच्या डॉ. जिवीता अतुल जमदाडे यांना 1422 मते पडली तर भाजपाच्या मीनाक्षी विजय जमदाडे यांना 666 मते पडली. 756 मताधिक्याने राष्ट्रवादीच्या डॉ. जमदाडे विजयी झाल्या. प्रभाग चार मध्ये राष्ट्रवादीचे शारदा महेश काळे यांना 1162 मते पडली तर भाजपाच्या छाया राजेंद्र सदाफुले यांना 515 मते पडली. 647 मताधिक्याने राष्ट्रवादीच्या काळे विजयी झाल्या. चार ब मध्ये  राष्ट्रवादीचे संग्राम उर्फ पप्पू पवार यांना 1185 मते पडली तर भाजपाचे केदार काटे  यांना 587 मते पडली. 598 मताधिक्याने राष्ट्रवादीचे पवार विजयी झाले. कृष्णा भगत यांना 48 मते मिळाली.  

प्रभाग पाच मध्ये राष्ट्रवादीचे भारत खामकर यांना 956 मते मिळाली. तर भाजपाचे स्वप्नील भिलारे यांना 882 मते मिळाली. 74 मताधिक्याने राष्ट्रवादीचे खामकर विजयी झाले. पाच ब मध्ये भाजपाच्या ज्योती सचिन गांधी यांना 1015 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या ज्योती संतोष काळे यांना 764 मते मिळाली. 251 मताधिक्याने भाजपाच्या गांधी विजयी झाल्या. सुनिता धनंजय मलटणे यांना 36 मते मिळाली. प्रभाग सहा मध्ये भाजपाच्या जागृती मकरंद पोरे यांना 1024 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या रेणुका जाधव यांना 911 मते मिळाली. 113 मताधिक्याने भाजपाच्या पोरे विजयी झाल्या. शिवसेनेच्या विमल प्रताप लोखंडे यांना 113 मते मिळाली. सहा ब मध्ये भाजपचे विजय ढेकाणे यांना 1061 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे चरण गायकवाड यांना 978 मते मिळाली. 83 मताधिक्याने भाजपाचे ढेकाणे विजयी झाले. प्रभाग सात मध्ये राष्ट्रवादीचे शैलेंद्र देवकुळे यांना 924 मते मिळाली तर भाजपाचे कुलदीप शिंदे यांना 807 मते मिळाली. 117 मताधिक्याने राष्ट्रवादीचे देवकुळे विजयी झाले. सात ब मध्ये भाजपाच्या केतकी विजय मोरे-पाटणे यांना 996 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या विजया पांडूरंग खोपडे यांना 714 मते मिळाली. 282 मताधिक्याने भाजपाच्या मोरे-पाटणे विजयी.

प्रभाग आठ मध्ये राष्ट्रवादीचे अजित शिंदे यांना 909 मते मिळाली तर अपक्ष राजेंद्र देशमाने यांना 538 मते मिळाली. 71 मताधिक्याने राष्ट्रवादीचे शिंदे विजयी झाले. अपक्ष सुरेश देशमाने 434 मते, भाजपाचे अजित वनारसे 249 मते मिळाली. आठ ब मध्ये राष्ट्रवादीच्या डॉ. पद्मश्री प्रफुल्ल चोरगे यांना 1352 मते मिळाली तर भाजपाने पाठींबा दिलेल्या पद्मा विष्णू पिसाळ यांना 768 मते मिळाली. 584 मताधिक्याने डॉ. चोरगे विजयी झाल्या. प्रभाग नऊ अ मध्ये राष्ट्रवादीच्या रेखा कांताराम जाधव या बिनविरोध निवडून आल्या. तर नऊ ब मध्ये अपक्ष सुशील खरात यांना 945 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेश जायगुडे यांना 810 मते मिळाली. 135 मताधिक्याने अपक्ष खरात विजयी झाले. अपक्ष प्रदिप बाळकृष्ण जायगुडे यांना 336, निलेश मोरे यांना 28 मते मिळाली राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदिप मारूती जायगुडे यांना 24 मते मिळाली.

****

प्रभाग दहा अ मध्ये राष्ट्रवादीच्या निलीमा खरात यांना 942 मते मिळाली तर अपक्ष संगिता राजेश गुरव यांना 711 मते मिळाली. 231 मताधिक्याने राष्ट्रवादीच्या खरात विजयी झाल्या. दहा ब मध्ये राष्ट्रवादीचे गुरूप्रसाद उर्फ सनी चव्हाण 928 मते मिळाली तर अपक्ष संदिप डोंगरे यांना 635 मते मिळाली. 293 मताधिक्याने राष्ट्रवादीचे चव्हाण विजयी झाले. शिवसेनेचे योगेश फाळके यांना 105 मते मिळाली.

प्रभाग अकरा अ मध्ये भाजपाचे संग्राम सपकाळ यांना 1503 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे संतोष गोंजारी 1342 मते मिळाली. 161 मताधिक्याने भाजपाचे सपकाळ विजयी झाले. अकरा ब मध्ये भाजपाच्या दिपाली सावंत यांना 1398 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या उज्वला शिंगटे यांना 1377 मते मिळाली. 21 मताधिक्याने भाजपाच्या सावंत विजयी झाल्या. अपक्ष मोनिका प्रकाश चव्हाण यांना 93  मते पडली. अकरा क मध्ये भाजपाचे नुतन गिरीधर मालुसरे यांना 1435 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या प्रिती निलेश सावंत 1291 मते मिळाली. 144 मताधिक्याने भाजपाचे मालुसरे विजयी झाल्या. शिवसेनेच्या अस्मिता गणेश सावंत 99 मते, शरद पवार राष्ट्रवादी यांना 37 मते मिळाली. सर्वाधिक 756 चे मताधिक्य प्रभाग तीन ब मधील डॉ. जिविता अतुल जमदाडे यांना मिळाले तर सर्वात कमी भाजपाच्या दिपाली सावंत यांना 21 चे मताधिक्य मिळाले. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. आपापल्या वॉर्डमध्ये विजयी उमेदवारांनी जल्लोषात मिरवणुका काढल्या. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहलिदार सोनाली मटकरी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी व पालिकेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे, दिपक पवार, यांनी योग्य कार्यक्रम राबविल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी पोलीस उपअधिक्षक सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे,  उपनिरीक्षक सुधीर वाळूंज, अमोल गवळी, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाई नगरपालिकेत भाजपला सत्ता स्थापन करण्यासठी संधी निर्माण झाली आहे. 

वाई नगरपालिका नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनिल सावंत, विजयी उमेदवार 10, राष्ट्रवादी काँग्रेस विजयी 11, बिनविरोध 1 असे 12 तर अपक्ष 1 असे बलाबल झाले आहे

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !