गाव स्वच्छता अभियानामुळे कान्हेगाव झाले चकचकीत
शिवशाही वृत्तसेवा फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
दिनांक १३ ऑगस्ट २०२३
ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायत च्या वतीने स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. लोकसभागातून ग्रामपंचायतीच्या वतीने गाव स्वच्छता अभियान राबवण्यात आले यामध्ये गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, सभागृह समाज मंदिरे इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. गावातील मंदिरात पाणी मारून धुऊन घेण्यात आले. रस्ते आणि इतर ठिकाणी झाडून कचरा व्यवस्थापन देखील करण्यात आले यामुळे संपूर्ण गाव चकचकीत झाले असून या गाव स्वच्छता अभियानाला ग्रामस्थांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
या ग्राम स्वच्छता अभियाना वेळी सरपंच भारती रवींद्र जंगले, उपसरपंच द्रौपदाबाई जंगले, ग्रामसेवक जे. के. तळेकर, सदस्य अंजनाबाई भास्कर भिवसने, नामदेव जंगले, त्रिंबक जंगले, ज्ञानेश्वर जंगले, कडूबाई जंगले, तसेच रवींद्र बाळा जंगले, भास्कर शामराव भिवसने, रामेश्वर जंगले सतीश जंगले सोमीनाथ जंगले कृष्णा जंगले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा