कान्हेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 15वा वित्तआयोग अंतर्गत विविध विकास कामांना सुरुवात
ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
दिनांक 22 नोव्हेंबर २०२३
फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती जंगले यांच्या नेतृत्वात विविध विकास कामांचा धडाका लावला असून परिसरात एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून लौकिक मिळवला आहे. कान्हेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरावा वित्त आयोग अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले आहे. यामध्ये रस्ते, अंगणवाडी, सभामंडप, पाणीपुरवठा, गटारे, इत्यादींचा समावेश आहे. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले तसेच सरपंच भारतीय जंगले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच भारती रवींद्र जंगले, उपसरपंच द्रौपदाबाई जंगले, ग्रामसेवक जे. के. तळेकर, सदस्य अंजनाबाई भास्कर भिवसने, नामदेव जंगले, त्रिंबक जंगले, ज्ञानेश्वर जंगले, कडूबाई जंगले, तसेच रवींद्र बाळा जंगले, भास्कर शामराव भिवसने, रामेश्वर जंगले सतीश जंगले सोमीनाथ जंगले कृष्णा जंगले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा