रमाई वस्ती ते शहापूर परिसरातील ग्रामस्थांना दिलासा
शिवशाही वृत्तसेवा फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
दिनांक २१ जानेवारी २०२४
दिनांक २१ जानेवारी २०२४
फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मनरेगा अंतर्गत मातोश्री पाणंद रस्त्याचे काम करण्यात आले. शासनाच्या पाणंद रस्ता विकास कार्यक्रम अंतर्गत रमाई वस्ती ते शहापूर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मनरेगा अंतर्गत हे काम केले असून त्यामुळे कान्हेगाव ग्रामस्थांच्या दळणवळणाचा त्रास बराचसा कमी होणार आहे. कान्हेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय योजना उत्कृष्ट पद्धतीने राबवण्यात येत असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे आभार मानले आहेत.
सरपंच भारती रवींद्र जंगले, उपसरपंच द्रौपदाबाई जंगले, ग्रामसेवक जे. के. तळेकर, सदस्य अंजनाबाई भास्कर भिवसने, नामदेव जंगले, त्रिंबक जंगले, ज्ञानेश्वर जंगले, कडूबाई जंगले, तसेच रवींद्र बाळा जंगले, भास्कर शामराव भिवसने, रामेश्वर जंगले सतीश जंगले सोमीनाथ जंगले कृष्णा जंगले यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि प्रयत्न केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा