फुलंब्री तालुक्यातील कान्हेगावचे मुख्य प्रवेशद्वार झाले सुंदर आणि आकर्षक

१५व्या वित्त आयोग अंतर्गत मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण
Main entrance beautification, kanhegaon, fulambri, sambhaji nagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
दिनांक १९ फेब्रुवारी २०२४

कान्हेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरावा वित्त आयोग अंतर्गत गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायतीने चालू आर्थिक वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून भरघोस विकास कामे केली आहेत. सरपंच द्रोपदाबाई जंगले यांच्या नेतृत्वात ही ग्रामपंचायत पंचक्रोशीत अग्रेसर ठरली आहे. पंधरावा वित्त आयोग अंतर्गत आता कान्हेगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. देखभाल दुरुस्ती व रंगरंगोटी यामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
सरपंच भारती रवींद्र जंगले, उपसरपंच द्रौपदाबाई जंगले, ग्रामसेवक जे. के. तळेकर, सदस्य अंजनाबाई भास्कर भिवसने, नामदेव जंगले, त्रिंबक जंगले, ज्ञानेश्वर जंगले, कडूबाई जंगले, तसेच रवींद्र बाळा जंगले, भास्कर शामराव भिवसने, रामेश्वर जंगले सतीश जंगले सोमीनाथ जंगले कृष्णा जंगले यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि प्रयत्न केले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !