वाईच्या गुन्हे शाखेचा राज्यात डंका
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ऑगस्ट २०२३ पासुन फसवणुक करुन परस्पर विकलेले सुमारे ९० लाख रुपये किंमतीचे ६ ट्रक व डंम्पर महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातुन तसेच हैद्राबाद, गुजरात येथुन वाई पोलीस ठाण्यातील सातारा जिल्ह्यात कर्तव्यदक्ष डिबी असा नावलौकिक प्राप्त असलेल्या तपास पथकाने हस्तगत केले आहेत.
वाई पोलीस ठाण्यात गु.र.नं ५९/२०२२ कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन, या गुन्ह्यातील सहा ट्रक हे वाईच्या डिबी पथकाचे प्रमुख असलेले सुधीर वाळुंज व त्यांच्या टिमने पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शना खाली औरंगाबाद, हैद्राबाद, कर्जत, व खुलताबाद येथुन यापुर्वी जप्त केलेले आहेत.
या गंभीर गुन्ह्यातील उर्वरीत ट्रक हा रोहित रमेश शिंदे यांचे मालकीचा आयशर कंपनीचा १११० मॉडेलचा ट्रक क्र एमएच ११ सीएच ५१६० हा असुन सदर गुन्हयाचे अनुशंगाने सखोल तपास करता, सदरचा ट्रक हा नाशिक परिसरात एका अनोळखी इसमाकडे असल्या बाबत खात्री लायक माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांना प्राप्त झाली होती.
त्यानुसार पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी वाई पोलीस ठाण्या मधील तपास पथकाचे अधिकारी सुधीर वाळुंज व त्यांच्या तपास पथकाला दिली .
फसवणुक करुन परस्पर विकलेला ट्रक जप्त करण्यासाठी नाशिक येथे जाऊन तपास करुन सदरचा ट्रक हा हस्तगत करण्याचे आदेश जितेंद्र शहाणे यांनी दिल्याने तपास पथकाने सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक विश्लेषण केल्या नंतर सदरचा ट्रक हा नाशिक शहरात असल्याचे निष्पन्न झाल्याने वाई पोलीस ठाण्यातील डिबी विभागाचे प्रमुख असलेले सुधीर वाळुंज व तपास पथक तपास कामी जिल्हा नाशिक येथे रवाना होऊन वीस लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक क्र एमएच ११ सीएच ५१६० हा दिनांक १४ जुन रोजी जिल्हा नाशिक येथील म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीमधुन ईमाम खान या व्यक्ती कडुन सापळा रचुन ताब्यात घेतला. माहे ऑगस्ट २०२३ पासुन फसवणुक करुन परस्पर विकलेला सुमारे ९० लाख रुपये किंमतीचे ट्रक व डंम्पर महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातुन तसेच हैद्राबाद गुजरात येथुन ताब्यात घेतले आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शना खाली वाई पोलीस ठाणे प्रभारीअधिकारी जितेंद्र शहाणे, पोलीस निरीक्षक वाई तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सुधिर वाळुंज, पोलीस अंमलदार राम कोळी, नितीन कदम, हेमंत शिंदे, श्रावण राठोड व विशाल शिंदे यांनी हि धाडसी कारवाई केली .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा