maharashtra day, workers day, shivshahi news,

खोडव्यावर प्रेम करणे ही काळाची गरज - डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके

किसन वीर कारखान्यावर ऊस पिक कार्यशाळा संपन्न
Workshop, sugarcane, kisanveer sugar factory, wai, satara, Shivshahi news,


शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
खोडवा ऊसाबाबत शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यासाठी सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांनी जे अथक प्रयत्न केलेले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही या कार्यक्रमास भरभरुन साथ दिलेली आहे. आजच्या बदलत्या हवामानावर खोडव्या ऊस हा एकप्रकारे वरदान ठरणारा खोडव्यावर प्रेम करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे येथील कृषी महाविद्यायातील माती व पाणी चिकित्सालयाचे व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी केले.
 
किसन वीर कारखाना, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पुणे येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरणपुरक खोडवा ऊसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादन या विषयावर ऊस पिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीनकाका पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन व कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ, जेष्ठ संचालक बाबासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
डॉ. फाळके पुढे म्हणाले की, खोडव्याचे उत्पादनाची क्षमता पाहिल्यास आतापर्यंत जास्तीत जास्त २५ टनापासुन ५० टनापर्यंत गेलेली दिसून येते. परंतु खोडवा ऊसाचे योग्य मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन केल्यास त्याचे उत्पादन एकरी ८० टनापर्यंत जाते. खोडवा ऊसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमी खर्चात वाढ करणे हेच आमचे उद्दिष्ठ असुन याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला व कारखान्याच्या फायद्यासाठी हंगामानुसारच ऊस लागवड करणे गरजेचे असुन त्यासाठी ऊस बियाणेही उच्चप्रतीचे घेणे गरजेचे आहे. जमिनीची सुपिकता, मातीमध्ये असणारे पोषक घटक याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी पाचट पेटविल्यानंतर त्याचे काय काय दृष्परिणाम होतात याची जाणीव देऊन खोडवा पिकामुळे कोणकोणते फायदे होतात त्याचा निसर्गाचाही समतोल राखण्यास मदत होतो या गोष्टीची जाणीवदेखील करून दिली.
व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील लोकांना खोडवा ऊसाचे उत्पादन कशापद्धतीने वाढवावे व यातुन शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही कारखाने आर्थिक अडचणीतून नक्कीच बाहेर पडणार आहोत. सध्या आपण आर्थिक अडचणींना सामोरे जात असून यावर्षीची उर्वरित ऊस बीलेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचा संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे खोडव्याचे उत्पादन वाढल्यास त्याचा फायदा कारखान्यालाच होणार असून शेतकऱ्यांनी याही वर्षी आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे नोंद करून गळीतासाठी देण्याचे आवाहनही केले.
 
जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक संदिप शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी आपल्या शेतामधील माती व पाणी परिक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासाठी जिल्हा बँकेची योजने माहिती देताना सांगितले की शेतकऱ्यांच्या माती व पाणी परिक्षणासाठी त्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसुन जिल्हा बँक त्यासाठी ७५ टक्के व कारखाना २५ टक्के रक्कम उपलबध करून देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीची पत सुधारण्यासाठी प्रयत्न करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत. तसेच श्री. शिंदे यांनी बँकेच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.
पाडेगांव येथील ऊस रोग शास्त्रज्ञ डॉ. सुरज नलवडे यांनी जैविक घटकांमुळेही ऊसावर रोग कशाप्रकारे येतात जिवाणूंची उत्पती कशाप्रकारे होती याबाबत माहिती देऊन ऊसावरील विविध प्रकारच्या रोग व त्यावरील उपाययोजनांची माहिती चित्रफितीद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना दिली. एकात्मिक रोग नियंत्रणाचा वापर करणे गरजेचे असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे असून हंगाम सोडून ऊसाची लागण न करण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. ऊसावरील सर्व रोगांवर कशाप्रकारे नियंत्रण करण्याबाबतही उपस्थितांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. कारखान्याने व शेतकऱ्यांनीही ऊसाचे बेणेमळा सुरू करावा जेणेकरून योग्य व उत्तम प्रतिची रोपे तयार करता येतील. तसेच शेतकऱ्यांनीही अप्रसारित ऊस बेण्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही यावेळी शेतकऱ्यांना दिला.
कार्यक्रमाची सुरूवात कारखान्याचे संस्थापक देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली. सुत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले तर आभार संचालक दिलीप पिसाळ यांनी मानले. यावेळी संचालक सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भोसले, माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, ऊस तोडणी वाहतुक संस्थेचे चेअरमन बबनराव सावळे, उपाध्यक्ष अजय कदम, संचालक अरविंद कदम, ॲड. उदयसिंह पिसाळ, मानसिंग साबळे, कारखाना कार्यक्षेत्रातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !