एकसर येथे पुलावरून रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालक जागीच ठार

एकसर गावावर पसरली शोककळा

Rickshaw driver killed in accident, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्यातील पश्चिम भागात एकसर येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुलावरून रिक्षा पलटी होऊन  या अपघातात रिक्षा चालक विशाल मुगुटराव कळंभे वय (37) या  युवकाचा  जागीच मृत्यू झाला

 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विशाल कळंभे हा आपली रिक्षा घेऊन मंगळवारी पहाटे वाई वरून घरी निघाला होता. अचानक रस्त्याचा अंदाज न आल्याने रिक्षा ओढ्याच्या पुलावरून खाली कोसळली. या घटनेत विशाल कळंभे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन  ते थेट ओढ्याच्या पाण्यात पडले.  रात्रीच ही घटना घडलेली असावी रात्रीच  लक्षात न आल्यामुळे पहाटे स्थानिक नागरिकांनी रिक्षा व मृतदेह पाण्यात पाहिला.  गावातील युवकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. 

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विशाल कळंबे यांचा मृतदेह ओढ्यातून बाहेर काढण्यात आला आणि तो शवविच्छेदनासाठी वाई येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. विशाल कळंबे यांचा मृत्यू झाल्यामुळे एकसर गावावर   शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मोठा भाऊ, विवाहित बहीण व आई असा परिवार आहे. पश्चिम भागातील व गावातील अनेक युवक व ग्रामस्थांनी  व शिवसेना नेते विकास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डॉ. नितीन सावंत, ऍड. जगदीश पाटणे, युवा नेते बाळासाहेब चिरगुटे आदिनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पुढील तपास वाई पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !