आर्य वैश्य समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारोती राजेश्वर कत्तुरवार व प्रदीप जीवनराव देमेवार यांच्या पुढाकारातून वासवी माता जयंती निमित्त स्व. बायानाबई जवादवार यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ आर्य वैश्य समाजातील नोदंनीकृत जेष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
वासवी माता जयंती निमित्त आज रोज शनिवार दि. 18 हे रोजी सकाळी ठिक 8:00 वाजता शहरातील स्वामी रामानंद तीर्थ चौक या ठिकाणी वासवी माता जयंती निमित्त स्व. बायानाबई जवादवार यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने माजी आ. वसंतराव चव्हाण, श्रीराम उध्दवराव मेडेवार (उद्योगपती), नांदेड, माजी जि.प.सदस्य बालाजी गणेशराव बच्चेवार यांच्या शुभ हास्ते आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी आपली उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान श्रीनिवास व्यंकटी जवादवार, वसंत व्यंकटी जवादवार, सुधाकर व्यंकटी जवादवार व समस्त जवादवार परिवार व समस्त गावकरी मंडळी नायगांव बाजार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा