परिसरात व्यक्त केली जात आहे हळहळ
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वरखडवाडी ( ता. वाई ) येथील देशमुख फार्महाऊस मधील स्वीमिंगपुलात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. अर्णव अरविंद साळुंखे ( वय १०, मूळ रा. शेलारवाडी, ता. वाई, हल्ली रा. खार, सांताक्रुज, मुंबई ) असे मृत मुलाचे नाव आहे. दुपारी अडीच वाजण्यांच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, अर्णव दुपारी दोनच्या सुमारास आजी व मोठा भाऊ तसेच इतर लहान मुलांच्या सोबत वरखडवाडी तावाई येथील देशमुख फार्म हाऊस मधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नव्हते तरी त्याने स्विमिंग पूल मध्ये उडी टाकली. यावेळी नाकात तोंडात पाणी गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. यावेळी सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी त्याला तुला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी घोटवडेकर हॉस्पिटल येथे आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
सदर घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांना समजताच त्यांनी. पोलीस हवालदार एस. बी. पाटणकर व पी. आर. शिर्के यांना तातडीने डॉ.घोटवडेकरांच्या हॉस्पिटल मध्ये पाठवले . या पोलिस पथकाने मयत अर्णवचा मृतदेह ताब्यात घेवुन त्याचा रितसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी वाईच्या ग्रामीण रुग्णालययात पाठविला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा