२६००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे)
कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामणी शिवारात गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर पिशोर पोलिसांचाम छापा. दारू बनवण्याचे रसायनासह साहित्य जप्त. कन्नड तालुक्यातील धामणी शिवारात गावठी दारू पाडत असल्याची माहिती पिशोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांना माहिती मिळाली. नागवे यांनी बीट जमादार किरण गंडे व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सकाळी धामणी परिसरात पाठवले. ईशिनाथ डवण यांच्या शेताजवळील नाल्यात दगडाच्या चुलीवर गावठी हातभट्टीची दारू बनवत असताना पिशोर पोलिसांनी छापा मारला.
यावेळी आरोपी भुरा जाधव राहणार धामणी यास हातभट्टीची दारू बनवण्याच्या पकडले. २००० किमतीच्या आठ पांढऱ्या रंगाच्या ५० लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिकचे ड्रममध्ये चारशे लिटर रसायन तर ६००० किमतीचे ६० लिटर हातभट्टीची गावठी दारू वीस लिटरच्या तीन त्यांना पकडल्या एकूण २६००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिशोर पोलीस ठाण्यात संदीप भुरा जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई किरण गंडे, गजानन कराळे, बबीता शिंदे यांनी केली. पुढील तपास बीट जमादार किरण गडी करीत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा