माजी विद्यार्थी रमले शालेय जीवनाच्या आठवणीत
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वर्ग मित्रांच्या भेटीसाठी आतुर शाळा सोबत्यांनी २६ वर्षा नंतर विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवले अन् गुरु-शिष्य आनंदाने भरून पावले. निमसोड (ता.खटाव) येथील सिद्धनाथ विद्यालयाचे माजी विद्यार्थी १९९८ नंतर प्रथमच भेटले. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करुन छत्रपती शिवराय, सरस्वती पूजनाने विद्यार्थी स्नेह मेळाव्यास सुरवात झाली. राज्यभरातून आलेल्या, भेटीमुळे भारावलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पाद्यपूजन, औक्षण केले.
प्रत्येक मित्राचा जीवनक्रम समजून दिला- घेतला. बुवा महामुनी अध्यक्षस्थानी होते. शाळेची जागा देणगीदार शिवाजी घाडगे, व्ही.डी. माने, एम.टी. माने, शिकलगार, कदम, शेवाळे, पाटील, कुंभार, चन्ने, जाधव, वरुडे, पवार, निंबाळकर आदी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.विद्यालयास विद्यार्थ्यांतर्फे संगणक संच भेट देण्यात आला. संरक्षक भिंत व भौतिक सुविधा पूर्ततेबाबत चर्चा करण्यात आली.
नानासाहेब घाडगे, दादासाहेब शितोळे, शिवाजी मोरे, जनार्दन माने, किशोर सूर्यवंशी, धर्मराज कांबळे, हर्षदा पवार, सचिन खिलारे, सुरेखा माने, संतोष शेळके, यांनी मनोगत व्यक्त केले.माजी विद्यार्थी गुरुनाथ राठोड यांनी सूत्रसंचालन, जयश्री सावंत यांनी आभार मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा