सर्व सभासद हितचिंतक कंत्राटदार वाहन मालक आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या सन २०२५-२६ मील रोलरचे पुजन सोमवार (दि.७) रोजी खंडाळा कारखान्याचा सकाळी १० वाजता तर किसन वीर कारखान्याचा दुपारी ३ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिमा नितीन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने आर्थिक गर्तेंत सापडलेले किसन वीर व खंडाळा कारखान्याचे मागील तीन हंगाम यशस्वी केले. कोणत्याही प्रकारचे वित्तसहाय्य न घेता शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या जोरावर कारखान्याची उंचावलेली प्रतिमेमुळे किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने लवकरच नावारूपाला येणार असल्याचा आत्मविश्वासही आमच्या संचालक मंडळाला असल्याचे म्हटले आहे.
सन २०२५-२६ च्या मील रोल पुजन समारंभासाठी किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा